Monday, December 23, 2024
Homeसामाजिकलाखपुरीत ग्रामजयंती निमीत्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका प्रचार यात्रा....

लाखपुरीत ग्रामजयंती निमीत्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका प्रचार यात्रा….

वुत्तसेंवा – अतुल नवघरे

लाखपुरी : १९ , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे ग्रामजयंती निमीत्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका प्रचार यात्रा गुरुकुंज मोझरी मधून आज लाखपुरी येथे आणण्यात आले . सकाळी 9 वा. लाखपुरी प्रवेश व्दारा पासुन लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका आणण्यात आल्या व लक्षेश्वर संस्थान मध्ये तुकडोजी महाराजांचे चरण पादुका चे पुजन करुन , मान्यवरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

लक्षेश्वर संस्थान येथे सर्वांकरिता चहा, नास्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लक्षेश्वर संस्थान मधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका मिरवणूक निघाली व बस स्टॅन्ड लाखपुरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून हारअर्पण करण्यात आले. विशेष आणि चांगल्या नियोजनाबद्दल लक्षेश्वर संस्थांचे अध्यक्ष राजू दहापुते यांचे सत्कार करण्यात आले.

त्यानंतर भ. प .श्री. सुशीलदादा वनवे महाराज सचिव केंद्रीय प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम मोझरी,ऍड. वंदन कोहाडे सदस्य केन्द्रिय् प्रचार समिती सदस्य,श्री शिवाजीदादा म्हैसने जिल्हा सेवाधिकारी अकोला ,श्री रउफ शेख गुरुजी उपजिल्हा सेवाधिकारी अकोला.श्री श्रीकृष्ण सावळे गुरुजी जिल्हा प्रचार प्रमुख अकोला.श्री राजेंद्र घाडगे जिल्हा युवक संघटना अकोला, श्री निलेश ढाकरे सचिव अकोला जिल्हा,

सौ संगीताताई गावंडे महिला जिल्हाध्यक्ष अकोला. सौ.नूतन कोहाडे, भुजंगराव देशमुख, गजानन कडू,प्रदीप गिऱ्हे,भीमराव गावंडे,गणेशराव बेले,गुरूदास गावन्दे,दिलीप कऱ्हाडे,सह लाखपूरी येथील लक्षेश्वर संस्थान अध्यक्ष राजू दहापुते , नाना मेहर , प्रेम कैथवास , योगेश देशमुख , देविदास चव्हान , नारायण जामनिक , जानराव श्रीनाथ , गुरुदेव सेवा भजन मंडळ लाखपुरी व लक्षेश्वर महीला वारकरी मंडळ , गजानन महाराज हरिपाठ मंडळ ,महीला व पुरुष भजन मंडळी व लक्षेश्वर संस्थानचे सर्व सेवाधारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: