सांगली – ज्योती मोरे.
मिरजेतील हजरत ख्वाजा शमणा मिरासाहेब दर्ग्याच्या उसात 15 तारखेपासून प्रारंभ होतोय .समस्त देशभरातील हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या या उरसास लाखो भाविक येत असतात या काळात दर्गा परिसरात वाहतुकीची कोंडी कोंडी होऊ नये शिवाय सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यान कलम 33 लागू करून मिरासाहेब दर्गा ते शहर पोलीस ठाणे मार्गावर पोलीस वाहने अंबुलन्स फायर ब्रिगेड या वाहना व्यतिरिक्त इतर वाहनांना येण्या जाण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर तेली यांनी दिलाय.
मिरज मार्केट कडून एसटी स्टँड कडे जाणाऱ्या वाहनांसाठी मिरज मार्केट- जवाहर चौक- शास्त्री चौक- फुले चौक मार्गे एसटी स्टँड तर एसटी स्टँड कडून मिरज मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांनी फुले चौक- शास्त्री चौक मार्गे मिरज मार्केटकडे जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिस अधिक्षक डाॅ. तेली यांनी दिलाय.