Thursday, November 14, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांसाठी नियमात बदल; 'गाठीं' ऐवजी 'खंडी'त व्यवहार १३ तारखेपासून नियमित वायद्याचे सौदे...

शेतकऱ्यांसाठी नियमात बदल; ‘गाठीं’ ऐवजी ‘खंडी’त व्यवहार १३ तारखेपासून नियमित वायद्याचे सौदे ऑर्डर साइजसह महत्त्वाचे बदल…

अकोला – अमोल साबळे

‘सेबी’ने कापसावरील वायदेबंदी हटविल्यानंतर कापसाचे वायदे सोमवारपासून (दि. १३) सुरू होणार असल्याचे ‘एमसीएक्स ने स्पष्ट केले. ‘सेबी’च्या आदेशान्वये कापसाचे व्यवहार गाठीऐवजी ‘खंडी’त होणार असून, नवीन नियमानुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचेही ‘एमसीएक्स च्या सूत्रांनी सांगितले.’एमसीएक्स’वर पूर्वी कापसाचे व्यवहार गाठींमध्ये (१७२ किलो रुई) व्हायचे. यात बदल करण्यात आला असून, यापुढे ते खंडीमध्ये (३५६ किलो रुई) होतील. पूर्वी २५ गाठींचे एक ट्रेडिंग युनिट होते. ते आता ४८ खंडीचे करण्यात आले आहे.

शिवाय, कमालऑर्डर साईज १,२०० गाठीऐवजी ५७६ खंडीचा करण्यात आला आहे.कापसाचे वायदे येत्या १३ फेब्रुवारीपासून एप्रिल, जून व ऑगस्ट महिन्यांतील वायदे सुरू होणार आहेत. ‘सेबी’च्या नवीन नियमानुसार कापूस वायद्यांच्या सिंबॉल, डिस्क्रिप्शन, ट्रेडिंग युनिट, कोटेशन, कमाल ऑर्डर साईज, टिक साईज, डिलिवरी युनिट आणि सेंटर, तसेच गुणवत्ता स्पेसिफिकेशन, आदींमध्ये बदल केला असल्याचे एमसीएक्स’ने स्पष्ट केले आहे.वायदे बाजारात रुईचे व्यवहार होतात. शेतकऱ्यांना त्यांचा कापूस वायद्यांमधून विकता येईल.

व्यापारी व उद्योजकांना वायद्यांच्या माध्यमातून जोखीम व्यवस्थापन करता येईल. त्यातून कापसाचा व्यापार वाढण्यास, तसेच वायदे सुरू झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा होणार आहे.’सेबी’ने नियमांमध्ये केलेले बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. या बदलांमुळे वायदे बाजारातील नफेखोरीचे प्रमाण कमी होईल. शिवाय, कापूस उत्पादक ते गारमेंट उद्योजक या साखळीतील सर्व कड्यांना हे बदल फायदेशीर ठरणार आहेत.-

दिलीप ठाकरे, सदस्य-पीएसी (एमसीएक्स-कॉटन) तथाअँग्रोस्टार हातरुण–ओपन पोझिशन’मध्ये बदल-कमाल ओपन पोझिशन मध्येही मोठे बदल केले असून, एका खरेदीदाराला ९,६०० खंडीची ओपन पोझिशन (२० हजार गाठी) घेता येईल. यापूर्वी ही मर्यादा ३ लाख ४० हजार गाठींची होती. तसेच एकत्रित खरेदीदारांसाठी ओपन इंटरेस्ट कमाल मर्यादा ९६ हजार खंडीची (२ लाख गाठी) करण्यात आली असून, पूर्वी ही मर्यादा ३४ लाख गाठी होती. या बदलांमुळे उद्योजक व व्यापाऱ्यांना व्यवहार करणे सोपे जाणार असल्याचे “पीएसी (प्रॉडक्ट अॅडव्हायझरी कमिटी-कॉटन) च्या सदस्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: