Thursday, December 26, 2024
Homeराज्यमहायुतीचा उमेदवार बदलून द्या - कार्यकर्त्यांचे एकमत...

महायुतीचा उमेदवार बदलून द्या – कार्यकर्त्यांचे एकमत…

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या, निलंबनाची कारवाई मागे घया- पदाधिकाऱ्यांची मागणी

कार्यकर्ता संवाद कार्यक्रम दिनांक 17 ऑक्टोबर 2024

रामटेक – राजु कापसे

आज दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ला गंगा भवन रामटेक येथे संपन्न झालेल्या कार्यकर्ता जनसंवाद सभेमध्ये सुमारे 6 00 कार्यकर्त्यासह मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महायुती अंतर्गत निवडणूक जिंकणे सोयीचे व्हावे याकरिता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन खाली मागण्या संदर्भात विषयांवर चर्चा झाली कार्यक्रमांतर्गत मागण्या खालील प्रमाणे आहेत.

स्थानिक आमदार च्या दबावामुळे तडकाफडकी झालेली माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावरची निलंबनाची कार्यवाही हे महायुतीच्या उमेदवारा करता अतिशय घातक ठरत आहे .तेव्हा सदर निलंबनाच्या कारवाई संदर्भात विचार विनिमय करून सदर निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी.

महायुतीचा उमेदवार हा बदलवून द्यावा…

सदर मतदारसंघांमध्ये इतर ओबीसी बहुजन घटकांपैकी सुद्धा पात्र उमेदवार आहेत यानुसार सुद्धा महायुतीतून नवीन उमेदवाराची निवड करावी.. असे प्रतिपादन माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केले.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी सदर कार्यकर्ता संवाद बैठकीत सर्वानुमते वरील विषयावर चर्चा संपन्न झाली. तसेच स्थानिक अपक्ष आमदार यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता यांच्या मत घेण्यासाठीच आतापर्यंत वापर केलेला असल्याचे सुद्धा मत अनेकांनी बोलून दाखवले तर लोकप्रतिनिधी निधीपासून पाचही वर्ष वंचित राहिले याची खंतही भाजपा लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमात व्यक्त केली त्यामुळे आपल्या अधिकाराचा आमदार असावा अशा प्रकारचे मागणी कार्यकर्त्यातून सुद्धा विविध नारेबाजीतून समोर आली.

तसेच पक्षाचे लक्ष प्रामाणिक कार्यकर्त्याकडे जावे व भाजपा कार्यकर्त्यांच्या अखंड मेहनतीतून तसेच विविध अभियानाच्या माध्यमातून बळकट भाजपाचे आमदार निवडून आणण्याकरता व्हावे तसेच आतापर्यंत शिवसेनेला भाजपा समर्थन देता आली यावेळेस शिवसेनेचे अपक्ष आमदार यांनी मोठे मन करून भाजपाच्या नवीन उमेदवाराला समर्थन द्यावे अशा प्रकारची मागणी सुद्धा सदर कार्यक्रमांमध्ये करण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये साधारणता 512 प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी सह संयुक्त राजीनामे दिले .

    एवढे सर्व एकाच दिवशी आलेले राजीनामे म्हणजेच भारतीय जनता पार्टी कमळाचे चिन्ह एकनिष्ठ असल्याचे निदर्शनास आले. तसेच वरील मागण्यांचे निवेदन सुद्धा सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ता लोकप्रतिनिधी यांनी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट घेऊन पुढील सकारात्मक चर्चा करण्याकरिता कार्यकर्ता पदाधिकारी यांनी तयारी दर्शवलेली आहे.

    सदर चर्चा संवाद कार्यक्रमात माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या, निलंबनाची कारवाई मागे घेण्याकरिता सहभागी जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश ठाकरे, ,रामटेक पंचायत समिती सभापती नरेंद्र बंदाठे, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे ,रामटेक , तसेच रामटेक नगरपरिषद उपाध्यक्ष अलोक मानकर ,बाजार समिती माझी उपसभापती किशोर रहांगडाले, रेखा दोनदार, ,राजेश जयस्वाल, रामानंद आढामी, तेजपाल ,लक्ष्मण केणे, वसंत कोकाटे,

    नगरपालिका माझी उपाध्यक्ष कविता संजय मुलमुले, नगरसेविका लता कांबळे ,उज्वला धमगाये अनिता टेटवार , रत्नमाला अहिरकर, डॉ दिनेश भादुले , ज्ञानेश्वर ढोक ,पप्पू यादव ,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री नंदकिशोर चंदनखेडे , रामटेक शहराध्यक्ष उमेश पटले, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला ,विश्व हिंदू परिषद चे पदाधिकारी विनोद कोपरकर , अनिता महिला आघाडी अध्यक्ष नेहा गावंडे , सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सह 600 कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.

    Raju Kapse
    Raju Kapsehttp://mahavoicenews.com
    मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
    RELATED ARTICLES

    Most Popular

    Recent Comments

    error: