निशांत गवई
अकोला – धनादेश अनादर प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रशेखर रामभाऊ पाटील यांना सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे अजय माणिकचंद बिलाला यांनी चंद्रशेखर रामभाऊ पाटील व त्यांचे वडील रामभाऊ दौलतराव पाटील यांच्याविरुद्ध तीन लक्ष रुपयांच्या चेक अनादर प्रकरणाचा दावा दाखल केला होता.
त्यामध्ये अकोला येथील सहावे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी ए एल देसाई यांनी 9 जानेवारी 2023 रोजी निकाल देऊन चंद्रशेखर रामभाऊ पाटील व रामभाऊ दौलतराव पाटील यांना 6 महिने कारावासाची शिक्षा व 6 लक्ष रुपये दंड व नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावासाचे प्रावधान या आदेशात करण्यात आले आहे.