अमरावती – योगेश चांदणे
एस.सी.ई.आर.टी पुणे च्या वतीने इयत्ता नववी ते बारावी मध्ये असलेल्या मुलांना करिअरच्या दिशा निश्चित व्हाव्यात या दृष्टिकोनातून एस.सी.ई.आर.टी पुणे या राज्यस्तरावरून वेबिनार मालिका सुरू करण्यात आलेली आहे.आतापर्यंत दोन सेमिनार झाले आहे हा तिसरा सेमिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
महाराष्ट्रातील विविध समुपदेशक आपले योगदान देतात त्यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जनता हायस्कूल हरम या शाळेमधून समुपदेशक श्री चंद्रशेखर गुलवाडे हे तिसरे वेबिनार मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. उद्देश हाच आहे शासनाच्या शालेय विभागाचा की मुलांना करिअरच्या बद्दल जास्तीत जास्त माहिती व्हावी.त्यांना करिअर निवडीबद्दल चांगल्या तऱ्हेने माहिती मिळावी ,पुढे कधी करीअर निवडताना कोणतेही अडचण येऊ नये अशा पद्धतीचं काम राज्य सरकार शालेय शिक्षण विभाग एस सी ई आर टी पुणे च्या माध्यमातून करत आहे या आपल्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जनता हायस्कूल हरम येथील शिक्षकाची त्यामध्ये वर्णी लागली आहे.
चंद्रशेखर मनोहरराव गुलवाडे
पद- समुपदेशक शिक्षक
शिक्षण -एम. एससी गणित, एम ए शिक्षणशास्त्र, एम ए मानसशास्त्र, बी एड, DVG मुंबई, DSM नाशिक, DCP अमरावती,
कार्य -शिक्षण देणे प्रेरणादायी व्याखान व नवोउपक्रम करिअर कौशल्य वर आधारित अभ्यासक्रम मार्गदर्शन करणे.
10 ते 12 लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व हजारो विद्यार्थी याना सरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाली व व्यापार मध्ये स्थायिक झाले आहेत.