Saturday, December 21, 2024
Homeराज्यचंद्रपूर | ब्रह्मपुरीत ४५ कोटीच्या निधीतून साकारले जाणार विपश्यना केंद्र…

चंद्रपूर | ब्रह्मपुरीत ४५ कोटीच्या निधीतून साकारले जाणार विपश्यना केंद्र…

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्राह्मपुरी येथे विरोधी पक्षनेते मा. विजय वडेट्टीवार साहेब यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या ₹ ४५ कोटी निधीच्या विपश्यना केंद्राचे भूमिपूजन रॉयल मठ थायलंड , येथील डॉ. फ्रामहा फॉगसाबोर्न धम्ममणी , फ्रामहा सुपाचै सुयानो यांच्या शुभहस्ते पार पडला.

या सोहळ्यास खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांनी उपस्थिती दर्शवून जगात प्रगती च्या दृष्टीने आणि शांतता नांदण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार आचरणात आपण आणले पाहिजे असे मत खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी प्रामुख्याने – मा.ना.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार ( विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा ) , मा. प्रणितीताई शिंदे ( खासदार सोलापूर लोकसभा ) , डॉ. नामदेव किरसान ( खासदार गडचिरोली / चिमुर लोकसभा ) , कॅप्टन नटिकेट ( रॉयल मोनेस्ट्री, थायलंड ) , शिवानीताई वडेट्टीवार ( प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस महाराष्ट्र ) , मा. गगन मलिक ( सिने अभिनेता ) यासह चंद्रपूर जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: