गणेश तळेकर
मराठी रंगभूमीवर ‘चाणक्य’ ही व्यक्तिरेखा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळवून देण्यासाठी रंगभूमीवर ‘चाणक्य’ हे नाटक येत आहे. अभिनेता शैलेश दातार या नाटकात ‘चाणक्य’ ही भूमिका रंगवत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १९ ऑगस्ट रोजी दुपारी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणार आहे.
इ.स.पूर्व ३२० च्या कालखंडात घडलेली एक गोष्ट, ‘चाणक्य’ या नाटकाच्या माध्यमातून आजच्या काळात येत आहे. ‘अभिजात क्रिएशन्स’ निर्मित व ‘मिलाप थिएटर्स’ प्रकाशित या नाटकाचे मूळ लेखक मिहीर भुता असून, या नाटकाचा मराठी अनुवाद शैलेश दातार यांनी केला आहे. प्रणव जोशी हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे. निनाद म्हैसाळकर यांचे पार्श्वसंगीत व राहुल जोगळेकर यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.
शैलेश दातार यांच्यासह ज्ञानेश वाडेकर, ऋषिकेश शिंदे, नील केळकर, कृष्णा राजशेखर, प्रसाद माळी, संजना पाटील, हरिहर म्हैसकर, विक्रांत कोळपे, जितेंद्र आगरकर, रवींद्र कुलकर्णी, चैतन्य सरदेशपांडे आदी कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत.