मुंबई – गणेश तळेकर
२९ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता दादर पश्चिम येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात “सिंधुरत्न कलावंत मंच आयोजित” “कोकण रत्न सन्मान – २०२३” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कोकणची माणसं साधी भोळी त्याच्या काळजात भरली शहाळी…! असे म्हटले जाते. कोकण स्वर्ग आहे, या कोकणात अनेक रत्न जन्माला आली आहेत.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ११ रत्नांना आज सन्मानित करण्यात आले.
खूप छान, अतिशय सुंदर नाटय – नुत्य कलाकृती,गाणी आणि हास्य मनोरंजन कलाकृती सादर करण्यात आल्या,अनेक कलावंतांनी समुह डान्स,कॉमेडी स्किट करून मान्यवर पाहुण्यांची वा वा आणि टाळ्या मिळवल्या,समाजात अनेक विवीध मदत कार्य करत हे आजचे राजकीय मित्र मंडळी , स्पॉन्सर आणि प्रमुख पुरस्कार विजेते आणि प्रेक्षकांच्या साक्षीने हा दिमाखदार सन्मान सोहळा पार पडला.
श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट, श्री.कालिदास कोळंबकर,श्री मनोहर आचरेकर, श्री.प्रा.प्रदीप ढवळ ,श्री नविनचंद्र बांदिवडेकर,श्री सचिन नारकर , सौ.सुरेखा चाळके,सौ.शकुंतला नरे, श्री गुरुभाऊ मिठबावकर,श्री प्रवीण आमरे ,श्री हरी पाटणकर या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष कामगार नेते मा.आ.नरेंद्र पाटील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक श्री.अजय फणसेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष श्री विजय पाटकर सर याच्या हस्ते करण्यात आला, उपाध्यक्ष सौ. अलका कुबल व सर्व पदाधिकारी आणि सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते.
अनेक वर्तमानपत्रांचे तसेच अनेक वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती तसेच नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टीतील कलाकार तंत्रज्ञानी हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सिंधरत्न कलावंत मंच तर्फे शॉटफिल्म(लघुपट )स्पर्धा, गीत स्पर्धांची घोषणा करण्यात आली.सिंधुरत्न कलावंत मंच तर्फे या वर्षीचा चित्रपट फेस्टिव्हल रत्नागिरी व मालवण येथे डिसेंबरमध्ये करण्यात येणार आहे आहे असे या संस्थेचे सचिव श्री विजय राणे यांनी सांगितले.