Monday, December 23, 2024
Homeव्यापारसेंच्युरी मॅट्रेसची सानिया मिर्झासोबत नवीन मोहिम...

सेंच्युरी मॅट्रेसची सानिया मिर्झासोबत नवीन मोहिम…

स्लीपेबल्स मॅट्रेसची टिकाऊ, परवडणारी व सानुकूल श्रेणी लॉन्च

ग्राहकांना सर्वोत्तम स्लीपिंग सोल्यूशन्स व उच्‍च दर्जाचे मॅट्रेसेस देत सेंच्युरी मॅट्रेस या भारतातील तीन दशकांपासून कार्यरत स्लीप स्पेशालिस्ट कंपनीने विवाहाच्या हंगामानिमित्त ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सानिया मिर्झा यांच्यासोबत नवीन मोहिम लॉन्च केली आहे. या मोहिमेचे मिलेनियल्स व वृद्धांवर लक्ष्य आहे. सानिया या मोहिमेअंतर्गत सेंच्युरीमधील स्लीपेबल मॅट्रेसेसची परवडणारी, टिकाऊ व सानुकूल श्रेणी दाखवत आहेत. सेंच्युरीच्या स्लीपेबल मॅट्रेसेस त्‍वरित झोप मिळण्यासाठी आवश्यक आराम व टिकाऊपणा देत असल्याचे या नवीन मोहिमेतून दाखविण्यात आले आहे.

 ही मोहिम दाखवते की, स्लीपेबल्स मॅट्रेसेस बेड-इन-ए-बॉक्‍स प्रमाणे येतात. कलेक्शनमधील उत्पादनांमध्ये हायब्रिड मेमरी फोम पॉकेट स्प्रिंग मॅट्रेस, बोनेल स्प्रिंग मॅट्रेस आणि ऑर्थो मेमरी फोम मॅट्रेसचा समावेश आहे. ग्राहक सेंच्युरी मॅट्रेसच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्‍याही आघाडीच्या बाजारस्थळामध्ये टिकाऊ व सानुकूल मॅट्रेसेससाठी ऑर्डर करू शकतात. ग्राहक त्यांच्या पसंतीचा मॅट्रेस आकार नमूद करू शकतात, जे त्यांच्या घरी हवाबंद बॉक्समधून डिलिव्हर केले जाईल.

सेंच्युरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक श्री. मलानी म्हणाले, “सानिया मिर्झा यांच्यासोबतची नवीन मोहिम संगीतमय स्वरूपात मिलेनियल्सच्या झोपण्याच्या सवयींना मजेशीरपणे सादर करते. या मोहिमेअंतर्गत सानिया उत्तम प्रमाणित मॅट्रेसवर झोप घेण्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व सांगतात. सेंच्युरीचे स्लीपेबल्स जवळपास १० वर्षांची वॉरंटी व सर्टिप्युर-यूएस प्रमाणित फोमसह येतात आणि फक्त आघाडीच्या ऑनलाइन व्यासपीठांवर उपलब्ध आहेत.’’

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: