न्युज डेस्क – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे अमरावती – पुणे आणि बडनेरा – नाशिक दरम्यान उत्सव विशेष मेमू ट्रेन खाली दिलेल्या तपशिलांनुसार चालवणार आहे: १) अमरावती – पुणे मेमू (४ अप आणि ४ डाउन एकूण ८ सेवा) गाडी क्रमांक 01209 विशेष मेमू अमरावती येथून दि. ०५.११.२०२३ ते १९.११.२०२३ पर्यंत दर रविवारी आणि बुधवारी १२.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01210 विशेष मेमू पुणे येथून दि. ०६.११.२०२३ ते २०.११.२०२३ पर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी ०६.३५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल. थांबे: अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर आणि पुणे संरचना: ८ कार मेमू रेक *
२) बडनेरा – नाशिक मेमू (१४ अप आणि १४ डाऊन एकूण २८ सेवा)* गाडी क्रमांक 01211 विशेष मेमू बडनेरा येथून दि. ०६.११.२०२३ ते १९.११.२०२३ पर्यंत दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्याच दिवशी १९.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01212 विशेष मेमू नाशिक येथून दि. ०६.११.२०२३ ते १९.११.२०२३ पर्यंत दररोज २१.१५ वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल.
थांबे: बडनेरा, मुर्तजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक. संरचना: ८ कार मेमू रेक. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.