राहुल मेस्त्री
कुन्नूर ता.निपाणी येथे विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, राम मंदिर, हनुमान मंदिर व ग्रामस्थांतर्फे सद्गुरू, परमहंस स्वामीनाथ महाराज यांचा शतकमहोत्सवी पुण्यतिथी उत्सवास भक्तीमय वातावरणात उत्साहाने सुरुवात करण्यात आली. डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री – अकोळ यांच्या हस्ते स्वामीनाथ महाराज व पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार हे होते.ते बोलताना म्हणाले सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अजूनही बहुतांश कारखान्यांनी एफ आर पी अथवा ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर जाहीर केल्याशिवाय उसाची तोड देऊ नये. एफ आर पी वाढीव दिली असली तरी त्यानुसार उताराही जादा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे.
तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे गरजेचे आहे असे म्हणाले.ते पुढे बोलताना म्हणाले गेल्या दोन तीन वर्षापासून अतिवृष्टी महापूर आणि कोरोणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. तसेच अतिवृष्टी काळात सोयाबीन फुल शेती आणि भाजीपाला ही पिकाचे नुकसान झाले आहे.
नि पक्षपाती सर्वे न केल्याने अनेक शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊन त्यांना भरपाईमिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी जागृत होऊन उठाव करण्याची गरज आहे,असे मत रयतसंघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अनंत पाटील,चीनु कूळमोडे, नानासाहेब कुंभार,भारत चेंडके, भारत सुतार,रामचंद्र कुलकर्णी, विवेक चेंडके,संतोष पुजारी यांच्यासह शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.