रामटेक – राजु कापसे
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारला दमयंतीताई देशमुख बी.एड व डी.एड कॉलेज रामटेक येथे संस्थाध्यक्ष रविकांत रागीट प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे लोहपुरुष संबोधलेल्या दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पटेलांची जयंती साजरी करण्यात आली तसेच एकता दिवस साजरा करण्यात आला.
सरदार पटेल यांच्या जीवनावर बी.एड च्या विभाग प्रमुख प्रा.उर्मिला नाईक यांनी प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
प्रा. देवानंद नागदेवे यांनी एकता दिवस व सरदार पटेल यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितल.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातिल बी.एड च्या विभाग प्रमुख प्रा.उर्मिला नाईक, डी.एड च्या विभाग प्रमुख प्रा. शालू वानखेडे, NAAC समन्वयक प्रा.किरण शेंद्रे, प्रा. अनिल मिरासे, प्रा. देवानंद नागदेवे, प्रा. मयुरी टेम्भुरणे, प्रा. विलास मडावी, अतुल बुरडकर, राजेंद्र मोहनकर, निकिता फाये,संदीप ठाकरे उपस्थित होते