सांगली – ज्योती मोरे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड सोलापूर रिजन यांच्यावतीने रविवार ३० एप्रिल या दिवशी सक्षम सायकल दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सांगली शहरातील प्रमुख मार्गावरुन रविवारी सकाळी सक्षम सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगलीकरांनी मोठ्या संख्येने सायकलीसह उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
शहरातील गणपतराव आवाडे हायस्कूल क्रीडांगण येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड सोलापूर रीजन यांच्यावतीने ‘स्वास्थ्य पर्यावरण और इंधन संरक्षण के लिए सक्षम सायकल रॅली रविवार दिनांक ३० एप्रिल हा सक्षम सायकल दिवस साजरा करण्यात आला.
रॅलीचा मार्ग आरवाडे हायस्कूल येथून टिळक चौक, राजवाडा चौक, कॉंग्रेस कमिटी, पुष्पराज चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, एसटी स्टँड, मारुती चौक ते पुन्हा गणपतराव आरवाडे हायस्कूल क्रीडांगण असे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका राणी यादव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मिरज तहसीलदार डी. एस. कुंभार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. मेघना कोरे, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, हिंदुस्तान पेट्रोलियमचे विक्री निरिक्षक मुरली कृष्णा, सुजाता तांबट,
शिक्षक गजानन शिंदे, मुख्याध्यापक संजय शितोळे, मुख्याध्यापक सुभाष कांबळे, बाळकृष्ण पाटील, सुनील कुंभार, माधुरी कुंभार यांच्यासह सर्व डिस्ट्रीब्युटर्स, विद्यार्थी, पालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.