Monday, December 30, 2024
Homeराज्यसलग २४ तास सायकल चालवुन करणार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा…

सलग २४ तास सायकल चालवुन करणार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा…

वडील ऋषीकेश व मुलगा प्रथमेशचा साहसी उपक्रम…

राजु कापसे
रामटेक

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तथा क्रांतीविरांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतुने रामटेक येथील सृष्टी सौंदर्य चे ऋषीकेश किंमतकर तथा त्यांचे चिरंजीव प्रथमेश किंमतकर हे रामटेक ते यवतमाळ पर्यंत सलग २४ तास सायकल प्रवास करणार आहेत.

दरम्यान ते १४ ऑगस्ट ला पहाटेच्या सुमारास रामटेक येथुन निघणार असुन नागपुर – वर्धा – कळंब मार्गे यवतमाळ ला जाणार आहे व नंतर तेथुन रामटेकसाठी परतणार आहेत. विशेष म्हणजे या प्रवासाच्या अनुषंगाने ते एका जवाबदार नागरीक करीता पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, गावाचं सौंदर्यीकरण, वाहतुक नियम पाळून देशाला सुजलाम – सुफलाम बनविने हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचा संदेश नागरीकांना देणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: