गुणवंतांनी सामाजीक बांधलकीचे सदैव भान ठेवावे : खाेडगाडे यांचे आवाहन
अकोला – स्थानिक श्री. विश्वकर्मा मय पांचाल समाज मंडळ,मोठी उमरी यांच्या वतिने श्री.विश्वकर्मा मय सभागृह येथे सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ कार्यक्रम रविवारी उत्साहात संपन्न झाला.
यावेळी बाेलतांना चंद्रपूर येथील बना नागरी सहकारी बॅंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंतराव खोलगाडे यांनी गुणवंताचे काैतुक करत भविष्यात यशस्वी जिवन जगतांना सामाजीक बांधलीकीचे भान ठेवावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला मंचावर विश्वजागृती मिशन,अकोलाचे अध्यक्ष ,पुरुषोत्तम वानखडे, सुतार समाज पंचमुखी विश्वकर्मा वि.सं,अमरावतीचे अध्यक्ष श्रीराम गाडवे ,उत्कर्ष एज्युकेशनचे संचालक विवेक शास्रकार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिनकरराव बेलमकर,सुरेशराव देवीकर,विश्वकर्मा मयाचार्य नवयुग मंडळ,जुने शहर,अकोलाचे अध्यक्ष हरिदासजी ताथूरकर,
भाजपा,अकोला शहर महिला आघाडी उपाध्यक्षा जयमालाताई र.खेडकर, श्री.विश्वकर्मा मय पांचाल समाज मंडळ, मोठी उमरी,अकोलाचे अध्यक्ष राम येवतकर, सुरेशराव राजहंस आदी मंचावर प्रामुख्याने उपस्थित हाेते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रभु विश्वकर्मा ची पुजा करण्यात आली. प्रास्तावीक कार्याध्यक्ष सुरेश राजहंस यांनी केले.
कार्यक्रमात ईयत्ता १० वी, १२ वी, गुणवत्ता प्राप्त,पदवीधर, इंजिनिअर,आय.टी.आय. इ विद्यार्थ्यांचा फोल्डर,बॅग्स,प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला.
संचालन विशाल गणेशराव वडतकर आणि हरीष कल्याणकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव संतोष वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी श्री.विश्वकर्मा मय पुरुष बचत गट, प्रभू विश्वकर्मा बचत समुह आणि विश्वकर्मा नवयुवक सदस्यांनी परिश्रम घेतले.