Tuesday, September 17, 2024
Homeराज्यविविध उपक्रमांतून चिमणी दिवस साजरा, वनदिनानिमित्त ‘ओळख वृक्षांची’ या विषयावर चर्चासत्र...

विविध उपक्रमांतून चिमणी दिवस साजरा, वनदिनानिमित्त ‘ओळख वृक्षांची’ या विषयावर चर्चासत्र…

रामटेक – राजु कापसे

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवनी अंतर्गत सामाजिक वनीकरण रोपवाटिका नवेगाव खैरी व राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ रामटेकचे सचिव मयंकराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली २० मार्चला विविध स्पर्धांत्मक उपक्रम राबवून ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि व.प.अ. किशोर कैलुके (सामाजिक वनीकरण), यांनी मानवी जीवनात वनांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या ललिता राऊत (उपसरपंच), वनपाल विजय येरपुडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वनरक्षक दिनेश ठाकरे, सुरज चोपडा व मनोहर शेंडे, बाळा ढोके, गजानन ढोंगे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचे मार्गदर्शक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चित्रकला, शुभेच्छा संदेश कार्ड निर्मिती, वक्तृत्व स्पर्धा आणि पक्षी पाणपोई असे विविध उपक्रम राबविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सेजल कळमकर, व्दितीय प्रतीक्षा वारकर, तृतीय रिद्धी राऊत, चित्रकला स्पर्धा प्राथमिक गटात प्रथम अथर्व मेश्राम,

व्दितीय ज्ञानेश्वरी मोहनकर तृतीय दिशा करमकर व त्रिवेणी सावरकर माध्यमिक गटात प्रथम समीक्षा सोनटक्के व अंजली कळमकर व्दितीय प्रणव ढोंगे तृतीय सक्षम सोनेकर, शुभेच्छा संदेश कार्ड निर्मिती स्पर्धेत प्रथम सेजल कळमकर, व्दितीय वैभव सहारे, तृतीय रोहित मुंगभाते या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

दिशा करमकर संजीवनी सूर्यवंशी, चांदणी सूर्यवंशी यांनी मधुरसुरांच्या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वंशिका सावरकर हिने कार्यक्रमाचे छायांकन व चित्रीकरण केले.हरित सेनेचे निसर्गदूत हर्षु पिल्लारे, त्रिशा सावरकर, अथर्व मेश्राम, अभिलाषा धुर्वे, आभा भरदिया, दिव्या दाढे, कावेरी रेवडे, समृद्धी सोनटक्के, पौर्णिमा मेंढेकर, रुचिका धुर्वे, संदीप टेकाम,

विवेक गजभिये, आर्यन कोडवते, समीर काळसर्पे, श्रवण ढोंगे, कृणाल कोकोडे, साहिल ठाकरे, अनिकेत पुरकाम, दिपांशु पंधराम, अनिरुद्ध शेंडे, आयुष ढोरे, नैतिक वरठी, प्रणय उईके, हिमांशू तिरकी, हिमांशू डोंगरे, प्रणय आरसे, हर्षल बेदरे, अक्षरा कळमकर, आर्या ढोरे, खुशी खंडाळे, किरण पारधी, प्रीती भुर्रे, खुशी टोहने, अनुष्का ढोरे, फाल्गुनी जुराहे,

प्राची तुमडाम, सुहाना परतेती, रीत तांदूळकर, आयुषी पंधराम, पूर्वी वझाडे, श्रीदेवी सावरकर, आरुषी राऊत, भुवनेश्वरी शेंडे, आरुषी भागडकर, नंदिनी पुरकाम, प्रतीक्षा तुपट, वंशिका ठाकरे, सुहानी ढोंगे, त्रिवेणी परतेती, समीक्षा गोळांगे, दुर्गा डायरे, नेहा सिरसाम, प्राजक्ता दुनेदार, सरस्वती राऊत, अनुष्का ढोरे, प्रीती धूर्वे, रंजना टेकाम, नेहा इनवाते,

गायत्री नेवारे, दिव्या इडपाची, अश्विनी कुंभरे, आयुष गुरभेले, प्रणय उईके, रोहण बांबोडे, यश डायरे, विकेश कोरचे, नयन सोनटक्के, गोविंद चक्रवर्ती, अनुश मेश्राम, पवन ठाकूर, दर्शन बेदरे, नेहार राऊत, नैतिक ढोरे, प्रणय इडपाची, आर्यन भुर्रे, कुणाल उईके या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोपवाटिकेतील समस्त रोजंदारी वनमजूर यांनी प्रयत्न केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: