पातुरच्या वनराई गोरक्षण संस्थेला मदतीचा हात…
पातूर – निशांत गवई
पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. पक्ष्यांसाठी पाणपोई, जाणवरांसाठी पाणवठे उभारण्यात आले. तर पातुरच्या वनराई गोरक्षण संस्थेतील गोमाताना चारा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या वतीने शाळा परिसरात पक्ष्यांसाठी पाणपोई उभारण्यात आल्या. तसेच गु्रांसाठी पाणवठा तयार करण्यात आला. त्यांचप्रमाणे पातूर येथील वनराई गोरक्षण संस्थेतील शेकडो गोवंशाना चारा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी एक क्विंटल चारा देण्यात आला. यावेळी गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बोरकर, पत्रकार निशांत गवई, अविनाश पोहरे, महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बारतासे, जीवन ढोणे प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पोर्ट क्लब चे उदघाट्न
शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत स्पोर्ट्स क्लब चे उदघाट्न पार पडले. यावेळी चेस आणि कॅरम बोर्ड या दोन शालेय खेळाचे दालन उभारण्यात आले. यांनतर राबविण्यात आलेल्या शालेय स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, अविनाश पाटील, रवीकिरण अवचार, शीतल कवडकार, नयना हाडके, लक्ष्मी निमकाळे, नितु ढोणे, प्रिती धोत्रे, निकिता भालतिलक, अश्विनी आवटे, शानू धाडसे, योगिता देवकर, तृप्ती पाचपोर, हरिष सौंदळे, नरेंद्र बोरकर आदी उपस्थित होते.
यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.