दर्जेदार सेवा देत ग्राहकाच्या मनात स्थान बळकट करावे – मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी
अमरावती,दि.०८ जून २०२३ सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा करणे हे महावितरणचे ब्रीद आहे. त्यामुळे महावितरणची सेवा अधिक ग्राहकाभिमूख करत जनतेच्या मनात महावितरणचे स्थान बळकट करण्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले.
संत ज्ञानेश्वर सभागृह येथे पार पडलेल्या महावितरणचा १८ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याचे उद्धाट्क म्हणून ते बोलत होते.यावेळी अधिक्षक अभियंता सुनिल शिंदे,अधिक्षक अभियंता दिपक देवहाते,कार्यकारी अभियंता भारतभूषण औघड,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना मुख्य अभियंता म्हणाले की, ६ जून २००५ रोजी वीज मंडळाचे विभाजन झाल्यानंतर महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन कंपन्यांची निर्मिती झाली. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन विद्युत कायदा २००३ नुसार ग्राहकाची सनद,विद्युत लोकपाल,ओपन एक्सेसला परवानगी,
वीज वितरणासाठी समांतर वीज वितरण परवान्याने वीज क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली. महावितरणच्या प्रणालीतही तंत्रज्ञानाचा वापर करत पारदर्शक आणि सर्वांसाठी खूली असलेली व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यामुळे दारात असलेल्या स्पर्धेत टिकण्यासाठी यापुढे कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स दाखविल्याशिवाय पर्याय नसल्याने यावेळी त्यांनी सांगीतले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत २४ तास ऑन ड्यूटी काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ताणतणावातुन विरंगुळा मिळावा,आपसात स्नेहभाव वृध्दींगत व्हावा यासाठी कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांच्या सहभागाने महावितरणचा १८ वा वर्धापनदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचा मुख्य अभियंता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वरीष्ठ यंत्रचालक नाशिक परिमंडल संदिप पाचंगे यांच्या ‘ चूकीला माफी नाही’ या एकपात्री नाट्य प्रयोगाने कार्यक्रमाची सुरूवात करून वीज कर्मचाऱ्यांना जोखीमेच्या या क्षेत्रात सुरक्षा साधनाचा वापर करण्याची साद घालण्यात आली.
तर मंगेश ठाकरे यांनी ‘नमुने इरसाल’ सादर करत कर्मचाऱ्यांना हसविले.त्यानंतर कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचे सहभागाने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक अभियंत्या वैशाली ठाकरे,प्रीयंका सोळंके,प्रतिभा जीवतोडे ,कांचन मडावी,प्रफूल देशमुख यांनी केले.आभार अतीरिक्त कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे यांनी मानले.या कार्यक्रमाला अधिकारी,अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.