दानापूर – गोपाल विरघट
नवयुवक नवदुर्गा मंडळ दानापूर येथे आयोजित व्याख्यानात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माँ साहेब जयंती साजरी करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना घराघरात पोहचण्याची गरज आहे.प्रत्यक माता पित्यानां वाटत आपला मुलगा छत्रपती व्हावा परंतु त्याकरिता तुम्हाला जिजाऊ आणि शाहाजी व्हावें लागले नवरात्र नवशक्तीची उपासना आहे.
तीची नऊ दिवस आम्ही मनोभावे पूजा करतो पण आमच्या जन्मदात्या आईला वडीलाना वृद्धाश्रमात पाठवत असू तर आमची भक्ती काय कामाची,महिलांचा मानसन्मान झाला पाहिजे नारी शक्ती अगाध आहे.
जिजाऊंना वाटलं या मातीला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे जिजामातेला वाटले म्हणून शिवाजी घडले जो पर्यंत माॅ जिजाऊ घडणार नाही तो पर्यंत शिवाजी घडणार नाही आई जो पर्यंत संस्कार करणार नाही तोपर्यंत संस्कारित मुलगा घडणार नाही पहिला गुरु आई,आणी पहिला मार्गदर्शक वडील आहे म्हणून पुढची पिढी योग्य घडवायची असेल तर घराघरातील आई वडिलांनी घराघरात योग्य संस्कार देण्याची गरज आहे.
आज तरुणांनी सुध्दा थोर पुरुषाचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे आपल्या आईचं दर्शन घेतांना माँसाहेब जिजाऊ आठवल्या पाहिजे शिवरा आठवले पाहिजे शेतकरी राजासाठी योग्य नियोजन करणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत ४९३वर्ष झाले तरी आजही त्या नावात वेगळीच शक्ती आहे अशा जाणत्या राजाची सर्वात पहिले जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले होते त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे जो डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगुन गेले जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही.
आपण सदैव आपला इतिहास आठवला पाहिजे आपल्या मुलांना शिकण्याची गरज आहे वेसन करुन जयजयकार करणे गणेश विसर्जन मिरवणूक देवी नवरात्रौत्सव व विसर्जन मिरवणुकीत न शोभणारी गाणी लावून नाचने ही आपली संस्कृती नाही तो भागवतांचा व आपल्या संस्कृतीचा अपमान आहे यापुढे सर्व मंडळानी गणपती, देवी विसर्जन मिरवणुकीत आप ल्या संस्कृतीचे पालन करावे, तरुणाणी अनेक वाईट प्रकारावर लक्ष दिले पाहिजे आज देशात महिलावर अत्याचार होत आहेत.
हा प्रकार थांबविण्यासाठी आम्ही तयार असलो पाहिजे असे आपल्या व्याख्यानातुन सौरभ वाघोडे महाराष्ट्र महायुवा वक्ता यांनी मार्गदर्शन केले.मंडळाच्या वतीने हभप गायनाचार्य सागर महाराज राऊत यांनी सौरभ वाघोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.या व्याख्यानाला मोठ्या संख्येने गावातील तरुण जनसमुदाय माता भगिनी उपस्थित होते.