Monday, December 23, 2024
Homeसामाजिकदिंडनेर्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला सीसीटीव्ही कँमेरे बसवले...भिम ब्रिगेडने मागणी केली होती...

दिंडनेर्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला सीसीटीव्ही कँमेरे बसवले…भिम ब्रिगेडने मागणी केली होती…

राहुल मेस्त्री…

दिंडनेर्ली ता.करवीर येथील सिद्धार्थ नगर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून भिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सदर पुतळयाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरा बसविण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले होते.

या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिंडनेर्ली ग्रामपंचायतीने येथील सिद्धार्थ नगर येथे असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत.सदर मागणी कडे ग्रामपंचायतीने त्वरीत लक्ष घातल्याने सचिन कदम यांनी ग्रामपंचायत,गटविकास अधिकारी काकासाहेब पाटील,सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: