अमरावती – दुर्वास रोकडे
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित विक्रमशिला तंत्रनिकेतन दारापुर ता दर्यापूर जिल्हा अमरावती च्या कर्मचारी यांची याचिका क्रमांक ३५४१/२०२३ ची काल सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यांचे वकील ऍड चैतन्य मोहगावकर यांनी खाली नमुद बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या . १. जुलै २०२४ मध्ये सर्व कर्मचारी हजर असताना ७०% पर्यंत पगार कपात ही बिनपगारी रजा (LWP) च्या नावाखाली जाणीवपूर्वक करण्यात आली. २. पगार कापतीची विचारणा केली असता प्रभारी प्राचार्य प्रा मनीष मनोहर पाटील यांच्या मते सदर पगार कपात हि जून २०२४ मध्ये केलेल्या काम बंद आंदोलनामुळे करण्यात आली आहे.
सत्य परिस्थितीत जून २०२४ महिन्यात कुठलेही काम बंद आंदोलन नसून प्राचार्यांनी स्वतः सत्राची सांगता करून हजेरीपत्रक कस्टडी मध्ये ठेवले होते व स्वाक्षऱ्या करण्यास मज्जाव केला होता. याच महिन्यात पुनः मुलखतीचे षडयंत्र आखले होते. या सर्व बाबी लक्षात घेता कोर्टाने सर्व लोकांना १९/०६/२०२४ रोजी सर्विस प्रोटेक्शन दिलं होत.३. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात प्रचार्यांनी स्वतः सूचना पत्र काढून कर्मचाऱ्यांना स्वाक्षरी करण्याचे आदेश दिले होते.
४. जुलै २०२४ च्या कपात झालेल्या पगारानंतर प्रचार्यांनी जून २०२४ मधील हजेरीपत्रकावरील स्वाक्षऱ्या WHITNER लावून मिटवून टाकल्या (MUSTER TAMPERING).५. मुद्दामुन बदलेच्या भावनेने केलेली पगार कपात व हजेरीपत्रकावरील छेडछाड हा प्रकार अत्यंत गंभीर असुन कायद्याने गंभीर गुन्हा असल्याचे ऍड.मोहोगावकर यांनी काल कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
६. त्यावर न्या. अविनाश घरोटे व न्या. मुकुलिका जावळकर यांनी मूळ हजेरीपत्रक दिनांक २१/१०/२०२४ ला कोर्टात सादर करण्याचे निर्देश संस्थेचे वकील ऍड. पृथ्वीराज चव्हाण यांना दिले असुन त्याचे परीक्षण (assessment) कोर्टात होणार आहे व दोषी आढळल्यास कार्यवाही ची तरतूद करण्यात येणार आहे.
तोपर्यंत १९/०६/२०२४ रोजी पारित केलेल्या अंतरिम आदेशानुसार सर्विस प्रोटेक्शन चे आदेश कायम ठेवण्यात येतील.श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत संचालित तक्षशीला अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय दारापुर तसेच विक्रमशिला तंत्रनिकेतन दारापुर च्या कर्मचाऱ्यांनी विविध गटात याचिका दाखल केल्या असुन एकूण ५० करोड रुपयांच्या वेतन थकबाकी ची मागणी केली आहे .