Saturday, November 9, 2024
Homeव्यापारकॅरी माय पेटचा मुंबईत विस्तार, पाळीव प्राण्यांच्या स्थलांतराची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन...

कॅरी माय पेटचा मुंबईत विस्तार, पाळीव प्राण्यांच्या स्थलांतराची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन कार्यालयाचे उद्घाटन… 

कॅरी माय पेट या भारतातील विश्वसनीय पेट रिलोकेशन कंपनीला मुंबईमध्ये नवीन कार्यालयाच्या यशस्वीरित्या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद होत आहे. हे नवीन कार्यालय पवई, मुंबई येथे असून सध्या तेथे दहा कर्मचारी कार्यरत आहेत. हे नवीन कार्यालय प्रबळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपस्थिती निर्माण करण्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे.

कॅरी माय पेटने संपूर्ण देशातील पाळीव प्राणी स्थलांतर व परिवहन सेवांसाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्याकरिता पहिल्यांदाच दिल्ली-एनसीआर बाहेर कार्यालय स्थापित केले आहे. आतापर्यंत २०२२ मध्ये मुंबईमधून पाळीव प्राणी स्थलांतराबाबत १५०० हून अधिक चौकशी करण्यात आल्या आणि मुंबईमध्ये कार्यालयाचे उद्घाटन केल्यापासून कंपनीकडे शहरातून अधिक चौकशी करण्यात आल्या आहेत. आगामी वर्षामध्ये कंपनीला पाळीव प्राणी स्थलांतर सेवा १५ ते १८ टक्‍क्‍यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

दिल्लीमधील कंपनीने ६००० हून अधिक पाळीव प्राणी स्थलांतर पूर्ण केले आहे, जेथे स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ७२०० हून अधिक पाळीव प्राण्यांचे ३० हून देशांमध्ये स्थलांतर करण्यात आले. सध्या कंपनी आंतरराष्ट्रीय सहयोगींच्या माध्यमातून हे कार्य करते, पण कॅनडा, दुबई यांसह जगभरात कार्यालये स्थापित करण्याचा कंपनीचा मनसुबा आहे. कॅरी माय पेट जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत परिपूर्ण घरपोच सेवा देत जगभरात विस्तार करण्याचा प्रयत्‍न करत आहे.

कॅरी माय पेटचे सह-संस्थापक श्री. आमिर इस्लाम म्हणाले, ‘’गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील शहरांमधून मागणी वाढताना दिसत आहे. पाळीव प्राणी स्थलांतरासंदर्भात दिल्ली, बेंगळुरू व मुंबई या काही प्रमुख बाजारपेठा आहेत. मुंबईमधील आमच्या कार्यालयासह आमच्या टीमने एका महिन्यातच शहरामधून मागणीमध्ये लक्षणीय वाढीची नोंद केली आहे. आम्ही देशभरात विस्तार करण्यास उत्सुक आहोत आणि यापुढे बेंगळुरूमध्ये नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा मनसुबा आहे.’’

२०१९ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या कॅरी माय पेटने दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, कोची, बेंगळुरू व चेन्नई येथे प्रबळ उपस्थिती निर्माण केली आहे. मुंबईनंतर कंपनीची लवकरच बेंगळुरूमध्ये कार्यालय शाखेचे उद्घाटन करत आपली उपस्थिती वाढवण्याची योजना आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: