Sunday, October 13, 2024
Homeगुन्हेगारीकारने दुचाकीला धडक दिली, कारमधील दोन महिला आणि दुचाकी चालक जखमी...

कारने दुचाकीला धडक दिली, कारमधील दोन महिला आणि दुचाकी चालक जखमी…

बाळापूर – राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला ढकलल्यानंतर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळल्याची घटना काल सायंकाळी उशिरा महामार्ग क्रमांक 56 वरील व्याळा गावाजवळ घडली, यामध्ये दुचाकी चालक व दोन महिला जखमी झाल्यात. व्याळा येथून अकोल्याकडे जात असताना महामार्ग क्रमांक 53 वरून एमएच 12 केएन 3237 या कार व दुचाकी क्रमांक एमएच 30 बीए 1849 चा अपघात झाला.

कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली आणि दुचाकी बाजूला पडली, त्यामुळे दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकीस्वार व स्विफ्ट डिझायर कारमधील दोन महिला जखमी झाल्या, त्यांना व्याळा येथील नागरिकांनी तातडीने अकोल्याच्या रुग्णालयात दाखल केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: