Sunday, December 22, 2024
Homeराज्यकार व दुचाकीचा अपघात; एक युवक ठार, अकोला-पातूर रोडवरील घटना...

कार व दुचाकीचा अपघात; एक युवक ठार, अकोला-पातूर रोडवरील घटना…

पातूर – निशांत गवई

अकोला ते पातूर रोडस्थित असलेल्या बुद्धभूमी समोर कार व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
पातूर पासून अकोल्याकडे जाताना सुमारे 5 किलोमीटर अंतरावर शिर्ला फाट्यानजीक असलेल्या बुद्धभूमी समोर दि.10/12/2023 रोजी रात्री सुमारे 8:00 वाजताच्या दरम्यान कार व दुचाकी समोरासमोर धडकून अपघात झाला असून सदर अपघाताची माहिती उपस्थित प्रत्यक्षदर्शीनी पातूर पोलिसांना दिली,संबंधित माहितीवरून पातूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तडसे साहेब,रविंद्र इंगळे मेजर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तिथे कार व दुचाकीचा आपसात अपघात झाल्याचे निदर्शनास आले असून एक युवक जाग्यावरच मृतअवस्थेत पडून असल्याचे दिसून आले.

सदर घटनेची सविस्तर हकीकत अशी की,पातूर ते अकोला रोडवर असलेल्या शिर्ला फाट्यानजीक असलेल्या बुद्धभूमी समोर वाशिम कडून अकोल्याकडे जात असलेल्या चारचाकी कार क्र.- एम.एच. 37 जी. 7011 ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्र.- एम. एच.30. बी.एम. 6885 यास समोरासमोर धडक दिली,ही धडक एवढी जबरदस्त होती की अक्षरशः दुचाकीचा चुराडा झाला असून कारच्या समोरील भाग इंजिनपर्यंत तुटल्याने कारच्या सर्व एअरबॅग उघडल्या होत्या.

सदर अपघातातील मृतकाचे नाव दीपक बाबुराव पळसपगार (वय 35 वर्ष) रा.अहमदपूर,अकोला असे असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला आहे. सदर प्रकरणी पातूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला असून वृत्त लिहिस्तोवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

अकोला ते पातूर हा रस्ता चौपदरी झाला असून देखील ग्रामस्थ रॉन्ग साईडने निष्काळजीपणाने वाहन चालवलत असल्याचे सर्रासपणे दिसून येते,अशातच समोरून येणाऱ्या वाहनांसाठी अचानकपणे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा सामना करावा लागतो आणि यामुळेच अपघाताचे प्रमाण वाढले असून आपल्या लेनने चालणाऱ्या व विरुद्ध दिशेने येणाऱ्यांच्या देखील जीवाचा धोका उद्भवत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: