सांगली — ज्योती मोरे
संसदेचे अधिवेशन सुरू असताना कल काँग्रेसचे नेते ज्यांच्याकडे काँग्रेसचे कार्यकर्ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून बघतात या खासदार राहुल गांधींनी आपल्या असभ्यतेचे दर्शन घडवत भाजपच्या महिला खासदारांना पाश्चात्त्य संस्कृतीचा फ्लाईंग किस देण्याचा लाजिरवाणा प्रकार केलेला आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या इटलीच्या संस्काराचे दर्शन घडवले, भारतीय परंपरा तसेच संसदीय शिष्टाचार याचे उल्लंघन राहुल गांधी यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांचे निलंबन करून त्यांची खासदारकी त्वरित रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकृष्ठाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री ओंकार शुक्ल यांनी आज निवेदनाद्वारे मिरज प्रांत यांचेकडे केलेले आहे.
निवेदनात पुढे असे नमूद केले आहे की भारतीय संस्कृतीमध्ये असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी या कृत्याबद्दल माफी तर मागितलीच पाहिजे परंतु त्यांचे निलंबन करून त्यांचे खासदारकी त्वरित रद्द केली पाहिजे.
श्री शुक्ल म्हणाले की भाजपचे महिला खासदार यांच्याकडे पहात राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला राहुल गांधी आपल्या असल्यामुळे वागण्यामुळे कायम संसदीय कार्यपद्धतीचा अपमान करत असतात. आणि असभ्यतेचे दर्शन घडवत असतात. भारतीय संसद ही अनेक चांगल्या चांगल्या खासदारांच्या विचारांनी मंत्रमुक्त झालेली आहे. अशा ठिकाणी हे त्यांचे कृत्य हे महिलांच्या शालिनीतेचा अपमान करणारे आहे. त्यामुळे राहुल गांधींना संसदेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही.
त्यांचे त्वरित निलंबन करावे. त्याचबरोबर त्यांच्या या कृत्याचे समर्थन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या पुरुष आणि महिला खासदारांचे सुद्धा निलंबन व्हावे अशी मागणी आम्ही करत आहोत. यावेळेस भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीचे भास्कर कुलकर्णी, महेश नाईक, विनायक इंगळे, निलेश साठे, अजित जोशी उपस्थित होते.