Friday, December 27, 2024
HomeUncategorizedबच्चू कडूंची आमदारकी रद्द करा!...पुण्यात पोस्टरबाजी...बच्चू कडू म्हणाले...

बच्चू कडूंची आमदारकी रद्द करा!…पुण्यात पोस्टरबाजी…बच्चू कडू म्हणाले…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याच्या २४ तासात लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. दरम्यान, आता आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. यासाठी पुण्यात आमदार बच्चू कडू यांचे पोस्टर लावीत आमदारकी रद्द होणार, नियम सर्वाना सारखेच असले पाहिजेत…यावर आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली…

पुण्यात बच्चू कडूंची आमदारकी रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले आहेत. यावर लिहिलं आहे की, “आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना सारखेच पाहिजेत.” यासह या बॅनरवर काही पुणेरी टोलेदेखील पाहायला मिळाले आहेत.

यावर टीव्ही ९ मराठीशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, “ही सगळी मुर्खता आहे. हे अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स आहेत. मला दोन कलमांमध्ये शिक्षा झाली आहे. दोन्ही मिळून केवळ एकाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते मला लागू होत नाही. त्यांना काही कामं नाहीत. ही सगळी अज्ञानपणाची लक्षणं आहेत.”

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ८ मार्च २०२३ ला दोन वर्षांची शिक्षा सुनावली. २०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने कडू यांना दमदाटी करणे व सरकारी कामांत अडथळा आणणे, या दोन कलमांतर्गत दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. परंतु त्यांचे सदस्यत्व रद्द झाले नाही.

लोकसभा निवडणुकीच्या (२०१९) प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, “सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं?” यावरून राहुल गांधींविरोधात भाजपाने खटला दाखल केला. सुरत कोर्टाने याचा निकाल देताना राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आणि त्यांना २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी (लोकसभा सदस्यत्व) रद्द करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: