संयुक्त शिक्षक कृती समितीचे स्थानिक एस.डी.ओंना निवेदन…
रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )
शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणीक व्याप पहाता शिक्षकांची केंद्र स्तरीय अधिकारी म्हणुन केलेली नेमणुक रद्द करण्यात यावी यासाठी संयुक्त शिक्षक कृती समिती, रामटेकच्या वतीने आज दि.२२ ऑगस्ट ला स्थानिक एस.डी.ओं. ना निवेदन देण्यात आले. यावेळी एस.डी.ओ. कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्या कार्यालयातील पाटील यांना निवेदन सोपविण्यात आले.
दिलेल्या निवेदनानुसार पंचायत समिती रामटेक येथील ८७ शिक्षकांची केंद्र स्तरीय अधिकारी म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे. परंतु कोव्हीड १९ महामारीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जेमतेम शाळा सुरू झालेल्या असुन विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
मात्र स्थानीक तहसिलदारांनी केंद्र स्तरीय अधिकारी म्हणुन शिक्षकांची नेमणुक केल्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे संयुक्त शिक्षक कृती समीतीतील शिक्षकांचे म्हणने आहे. तेव्हा शिक्षकांकडे केंद्र स्तरीय अधिकारी पदाची म्हणजेच बी.एल.ओ. ची कामे देण्यात येऊ नये असे म्हणत ही नेमणुक रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी संयुक्त शिक्षक कृती समीती च्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार करण्यात आलेली आहे.
यावेळी उपस्थितांमध्ये समीतीचे सचीव धरमसिंग राठोड, सहसचिव विकास गणवीर, कार्याध्यक्ष मनोहर वांढरे, कोषाध्यक्ष महीपाल बनगय्या, रुस्तम मोटघरे, दामोदर मोहनकर, एन.के. राठोड, महेंद्र सोनवाने, पवन कामडी, सिकंदर दमाहे, सुनील बारस्कर यांचेसह मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका यावेळी उपस्थित होते.