अकोला – संतोषकुमार गवई
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी 5 ते 18 वर्षांदरम्यानच्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य, शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
स्वत: बालक किंवा त्यांच्या वतीने राज्य शासन, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, पंचायतराज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदी अर्ज करू शकतात. पुरस्काराचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारले जातील, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिली.