पातूर – निशांत गवई
आज दिनांक 25 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्य सी.ई. टी. सेल द्वारा एम.बी. ए.अभ्यासक्रमाकरिता पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे त्याचाच आज संपूर्ण राज्यात विविध केंद्रावर पेपर होता. परंतु परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा लिंक वेळेत मिळाली नाही व वेळ पूर्ण न होताच पेपर लिंक सुद्धा बंद झाली ही सर्व बाबी मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
अशा भोंगळ कारभारामुळे सि. ई. टी. सेल चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे ह्या सर्व बाबी साठी जबाबदार असणाऱ्या सर्वांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी व आज दिनांक 25 मार्च रोजी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता सरसकट पात्र करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन ई मेल द्वारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे मागणी मान्य न केल्यास आम्ही विद्यार्थी हितार्थ रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद द्वारा तीव्र आंदोलन करण्याचा आकाश गुलाबराव हिवराळे जिल्हासंघटक रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, अकोला यांनी दिला आहे.