Byju’s : बायजू या ऑनलाईन शैक्षणिक संस्थेने बीसीसीआयसोबत मोठी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. बायजूने बीसीसीआयची १५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याने बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयने वारंवार नोटीस देऊनही कंपनी पैसे देत नाही. काय आहे हे संपूर्ण प्रकरण. बीसीसीआय बायजूच्या जाळ्यात कसे अडकले आणि आता 158 कोटी रुपये पणाला लागले आहेत.
बीसीसीआयने पैसे भरण्यासाठी बायजूला 2 आठवड्यांचा वेळ दिला आहे. या मुदतीनंतरही बायजू यांनी पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, हे प्रकरण या वर्षी 8 सप्टेंबर रोजीच उघडकीस आले, परंतु अधिकृतपणे हे प्रकरण 15 नोव्हेंबर रोजी नोंदवण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी बीसीसीआय आणि बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात गेल्या महिन्याच्या २८ तारखेला होणार होती, मात्र आता या प्रकरणाची सुनावणी २२ डिसेंबरला होणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
Byju’s ने BCCI, ICC आणि FIFA सोबत ब्रँडिंग भागीदारी केली होती. या करारांचे 2023 मध्ये पुन्हा नूतनीकरण केले जाणार होते, परंतु कंपनीने करारांचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. यानंतर, ईडीने फेमा उल्लंघन प्रकरणात थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड आणि बायजूच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. याप्रकरणी बायजूच्या मालकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अशा स्थितीत पुढील सुनावणीत या प्रकरणावर काय निर्णय होतो हे पाहायचे आहे.