Monday, December 23, 2024
Homeराज्यजबाबदारीने काम केल्याने सुप्त गुणाना वाव मिळतो - डॉ. जयवंत चौधरी...

जबाबदारीने काम केल्याने सुप्त गुणाना वाव मिळतो – डॉ. जयवंत चौधरी…

किट्स मधे १९ फोरम व असोसिएशन च्या उद्घाटनच्या वेळी डॉ. जयवंत चौधरी यांचे संबोधन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अँण्ड साइंस (किटस) रामटेक येथे विविध १९ क्लब, असोसिएशन व फोरमच्या उद्घाटन समारंभ किट्सच्या सिल्वर जुबली हाल मध्ये २९ ऑगस्ट ला संपन्न झाला.

प्रमुख अतिथी म्हणून संस्कृत विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. जयवंत चौधरी होते. या वेळी प्रामुख्याने किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, डीन डॉ. पंकज आष्टणकर, विविध विभागातील डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक सहित विविध फोरम व असोसिएशनचे प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रमुख अतिथी डॉ. जयवंत चौधरी मार्गदर्शनपर म्हणाले की विविध फोरम च्या संयुक्त उपकर्मामधे जबाबदारीने काम केल्याने सुप्त कलागुणाला वाव मिळतो. विद्यार्थांनी अहंकारी बनू नये. विजन ठेऊन सकारात्मक विचार ठेवावा. कैरियर विषयी गहन विचार करा. प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्कीच येते.

प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की फोरम व असोसिए शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकोपा व आत्मविश्वास वाढतो. दुसऱ्याना त्यांचा चांगल्या कामाविषयी चांगले म्हणा.

डीन डॉ.पंकज आष्टणकर यानी विविध फोरम व असोसिएशनच्या कार्यपद्धति विषयी माहिती दिली व म्हणाले यामुळे विद्यार्थांचे कौशल वाढते. संचालन जास्विनी गुलापल्ली व आर्यन अहिरकर तर धन्यवाद गुंजन पोटे यांनी केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: