अहेरी येथील भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविघालयात ०८ सप्तेंबर २०२३ रोज शुक्रवारला ” आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन” प्राचार्य श्री जी.एफ. मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी साक्षरता दिंडी व रॅलीचे आयोजन करण्यात आले. साक्षरता अभियानाचे प्रमुख प्रा. उत्तम. मुंगमोडे यांनी साक्षरता दिंडीला हिरवी झेंडी दाखविली. ”
साक्षर जनता, भूषण भारता !!,” ज्ञानाचा दिवा , घरोघरी लावा !!,” एक घर, साक्षर कर!! या घोषवाक्यावर निनादत साक्षरता रॅली चर्च, जुनी तहसिल ऑफीस, राजवाडारोड, गांधी चौक, दानशूर चौक, बाजारवाडी या मार्गाने फिरवून साक्षरता दिनाची जनजागृती करण्यात आली.
यावेळी रॅली सोबत प्रा. उत्तम मुंगमोडे, प्रा. श्रीराम डूकरे, प्रा.विलास पिंपळकर, प्रा रुपेश सुनतकर, प्रा. सुहास मेश्राम, प्रा. कोमल चौधरी, प्रा.शबनम सय्यद, प्रा. सलमा शेख तसेच शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.