Wednesday, October 16, 2024
Homeराज्यराहत्या घरात उद्योजकाची गळफास घेऊन केली आत्महत्या...

राहत्या घरात उद्योजकाची गळफास घेऊन केली आत्महत्या…

राजू कापसे

नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरातील राधाकृष्णन वॉर्ड येथील एका उद्योजकाने आपल्या राहत्या घराच्या दरवाज्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.9 सप्टेंबर रोजी 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, रामटेक शहरातील राधाकृष्णन वॉर्ड येथील रहिवासी उद्योजक नीरज नरेंद्र जैन वय 45 वर्ष. यांनी स्वतःच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील दरवाज्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. 10 वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी बोलवायला गेली असता घडलेला प्रकार लक्षात आला.तिने कुटुंबियांना आवाज दिला मात्र तोपर्यंत नीरज जैन यांची प्राणज्योत मालावली होती.

घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविले. मनमिळाऊ वृत्तीचे उद्योजक असणारे नीरज यांच्या मृत्यूने संपूर्ण रामटेक शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत…

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: