रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातिल नगरधन येथील विजयादशमिला १२ ऑक्टोबर रोजी नगरधन किल्ल्याच्या परिसरांत ३२ फूट उंच रावणाच्या पूतळ्याचे दहन करण्यात आले. बजरंग दल नगरधनच्या वतिने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उबाठाचे विशाल बरबटे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे,
जि. प. सदस्य दूधराम सव्वालाखे, भाजप तालूका अध्यक्ष राहूल किरपान, प.स. माजी उपसभापती उदयसिंह यादव प्रहारचे रमेश कारामोरे, शंकर होलगिरे, अनिल येळने, बजरंग दलाचे अध्यक्ष पिंटू अजबैले, खैरी बिजेवाडा येथील सरपंच रणविर यादव, नगरधन ग्रामपंचायत चे सरपंच मायाताई दमाहे, माजी सरपंच प्रशांत कामडी, विवेक भारद्वाज,
अशोक गंगाबोर, अनिल मुटकूरे सहित परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपति शिवाजी चौकातून झाँकी काढण्यात आली. झॉंकीचे संयोजक दिपक मोहनकर अजय बंधाटे निखिल सावसाखरे सहित आदीनी प्रयत्न केले.