Sunday, December 22, 2024
Homeदेश-विदेशPM मोदींच्या स्वागतासाठी बुर्ज खलिफा तिरंग्यात न्हाऊन निघाला...पाहा व्हिडिओ

PM मोदींच्या स्वागतासाठी बुर्ज खलिफा तिरंग्यात न्हाऊन निघाला…पाहा व्हिडिओ

न्युज डेस्क – फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पोहोचले. अबुधाबी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. पीएम मोदींनी अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली.

UAE मध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी दुबईचा बुरीज खलिफा भारतीय तिरंग्याच्या रंगात रंगला होता. भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदींचे चित्रही प्रदर्शित करण्यात आले. भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाइटमधूनच लिहिले होते.

यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या बुर्ज खलिफा भेटीदरम्यानही भारतीय तिरंगा प्रदर्शित करण्यात आला होता. गेल्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बुर्ज खलिफा येथे भारतीय तिरंगा फडकवण्यात आला होता.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: