सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यात घरफोडी सह चोरी करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीस आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज एसटी स्टँड परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. घरफोडीचा एक,मोटरसायकल चोरीचे दोन,मोबाईल चोरीचा एक, असे एकूण चार गुन्हे उघड झाले असून, त्याच्याकडून 1 लाख 44हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान विविध चोऱ्यांसह घरफोडींच्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना खास बातमीदारांने गणेश विष्णू माने.वय वर्षे- 25, मूळ राहणार-सावर्डे,फुटका घाणा. तालुका- तासगाव, सध्या राहणार – शांतीसागर हौउसिंग सोसायटी, भारत नगर, मिरज आणि अल्ताफ सौदागर, वय वर्षे – 26, राहणार- सुभाष नगर, शिंदे हॉस्पिटल जवळ,
मिरज आणि वसीम अल्लाबक्ष मुल्ला, वय वर्ष -33,राहणार- संजय गांधीनगर झोपडपट्टी,मिरज. हे तिघेजण मोबाईल, मोटरसायकल, गॅस सिलेंडर, सोन्या- चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे एसटी स्टँड कडे जाणाऱ्या पायवाटेवर थांबले असल्याची माहिती दिल्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांने छापा मारून या तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्या जवळील मोटरसायकल, गॅस सिलेंडर विषयी विचारले असता आणि सौदागर यांने वरील साथीदारांसह मिरज म्हैसाळ रोडवरून स्प्लेंडर सीडी डीलक्स, सुभाष नगरातील आश्रम शाळेजवळून तर मालगाव रोडवरील बंद घर फोडून त्यातील कानातील टॉप्स,
कानातील साखळी, चांदीचा मेखला, चांदीचे ब्रेसलेट, पैंजण आणि दोन गॅस सिलेंडर चोरल्याचं कबूल केले. आरोपींसह मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक रेडमी कंपनीचा मोबाईल ही त्यांनी चोरला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहेब,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, मच्छिंद्र बेर्डे, संजय कांबळे, सुधीर गोरे, सुनील चौधरी, राजू शिरोळकर, संदीप पाटील, राहुल जाधव, अमोल ऐदळे, संकेत मगदूम,अजय बेंद्रे, गौतम कांबळे, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते आदींनी केले.