मुर्तिजापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षानं काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांची सभा मुर्तिजापूर शहरात आयोजित केली होती. बटेंगे तो कटेंगे म्हणत त्यांनी मतदारांना महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री योगी यांनी भाषणादरम्यान केलं, गेल्या काही वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी त्यांची प्रतिमा बुलडोझर बाबा अशी केली आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या सरकारकडून अनेकदा गंभीर आरोप असलेल्या आरोपींच्या घरांवर, त्यांच्या मालकीच्या मालमत्तांवर बुलडोझरनं कारवाई केली जाते. त्यामुळे ते देशभरात बुलडोझर बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांच्या स्वागतासाठी पिंगळेंनी थेट बुलडोझरच मागवला होता. या बुलडोझरच्या बकेटमध्ये पिंगळे आणि योगी उभे राहिले. त्यांचा हा स्टंट पाहायला अनेकांनी गर्दी केली होती मात्र याचा फारसा परिणाम मतदारांवर होणार नसल्याचे राजकीय तज्ञ सांगतात.
ज्या गाडगेबाबा मुळे आपल्या शहराची ओळख आहे त्याचंच नाव योगिजी आपण विसरलात?. तुम्ही तर सोडा मात्र गाडगेबाबाची आठवण मंचावरील आमदारांना कशी झाली नाही?. या सभेत विद्यमान आमदाराने आपण पंधरा वर्षात काय काय केलं याचा पाढाच वाचला आणि मी कसा श्रीमंत झालो हे सुद्धा सांगितलं. आता मात्र मला कार्यकर्त्यांना श्रीमंत करायचं आहेत त्यासाठी आणखी पाच वर्ष तुम्ही मला द्या. गेल्या पंधरा वर्षांत मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा काय काय विकास केला ही जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. शहरात सिमेंटचे रस्ते बांधण्याला तुम्ही विकास म्हणता तोच विकास तुम्ही तुमच्या मित्राच्या लेआउट मधून कसा नेला आणि स्वतःचा विकास ही जनतेपासून लपून राहिला नाही.
गेल्या पंधरा वर्षे साहेबांसाठी ज्यांनी दिवसरात्र मेहनत घेत मोठं केलं त्यांनाच तुम्ही विसरले होते मात्र शेवटच्या क्षणाला तुम्हाला आता कार्यकर्ते आठवत आहे. तुम्ही माझ्यासाठी काम केलं नाही म्हणून मी तुमचं काम करणार नाही असे खडेबोल सूनवणारे साहेब आता त्यांची भाषा बदलली. साहेबांना ज्या गावात मतदान मिळालं नव्हतं अशी यादी साहेबांकडे होती जेव्हा कोणी गावातील काही मंडळी साहेबांना भेटायला जायची तेव्हा साहेब, तेव्हा त्यांच्या नोकराला आदेश देत म्हणायचे काढ रे ती डायरी आणि सांग यांच्या गावात किती मते मिळाली?… तेव्हा साहेब हिशोब करून त्यांना तुमच्या गावात मला मते मिळाली नाही, मी तुमचे काम करणार नाही थेट तोंडावर सांगून मोकळे व्हायचे. हे त्यांना कदाचित आठवत नसेल?. मागील निवडणुकीच्या वेळेस वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या वेळी गोंधळ घातला होता. त्याचा उल्लेख साहेबांनी यावेळी केला आणि गोंधळ घालणारे कोण होते?, त्याचा लीडर कोण होता? मग तो मागील पाच वर्षात तुमचा मित्र कसा झाला हे सांगायची गरज नाही.
प्रत्येक समाजात दोन-चार दलिंदर लोक असतात त्याच्यामुळे अवघा समाज बदनाम होतो मात्र या दोन चार दलिंदरांमुळे एका चांगल्या व्यक्तीचे किती नुकसान होते हे मागील निवडणुकीच्या वेळेस पाहायला मिळाले. ज्या समाजाचा हक्क या मतदारसंघावर आहे तोच समाज या मतदारसंघापासून वंचित आहे. मात्र यावेळी ज्या समाजाचा हक्क या मतदारसंघावर आहे, त्या समाजाला जनता आता निवडून देणार का?. काही लोकांच्या मते त्यांना पक्षाचं काही देणंघेणं नसून फक्त व्यक्ती म्हणून लोक सध्या त्यांच्या पर्यायी उमेदवार शोधत आहे. तर लोकांच्या मते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कालच्या भाषणाने त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नसल्याचे काही लोक सांगत आहे. तर या भाषणाचा फायदा विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांना होणार नाही असे स्पष्ट सांगत आहेत.