आमदार अमोल मिटकरी यांनी दिलीप वळसे पाटलांसमोरच शिवा मोहोडच्या नियुक्तीवर घेतला आक्षेप…
अकोला : राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीने पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू केले आहेय. सोबतच पक्ष मजबुतीसाठी नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भात पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावे पार पडत आहेय…
आज अकोल्यात ही पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्ष बांधणीसाठी जोमाने कार्य करण्याचं गुरूमंत्र कार्यकर्त्यांना वळसे पाटलांनी दिला. या मेळाव्यात मात्र शिवा मोहोड यांच्या जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती वर आमदार अमोल मिटकरी यांनी थेट दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली. शिवा मोहोडची आपण तक्रार अजित पवारांकडे केली असून या नियक्तीवर आक्षेप पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी जाहीर केली.
मिटकरी आणि मोहोड यांच्या या वादामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पक्षाच्या आणि जनतेच्या समोर आलंय.या वादामुळे मेळाव्यात काही काळ स्मशानशांती पसरली होती.
वादाचे कारण?
राष्ट्रवादीचे माजी युवक काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी काही महिन्यापूर्वी आमदार अमोल मिटकरींवर थेट कमिशनखोरीचा आरोप केला होता. हा आरोपही चक्क पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे पक्षाच्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला होता. या आरोपांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, अखेर याप्रकरणी मौन सोडत आमदार अमोल मिटकरींनी हे सारे आरोप फेटाळून लावलेत. परंतु आता पुन्हा वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर दोघांमधील मतभेद पुन्हा समोर आल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून येतो का? हे पाहणेही महत्वाच् ठरणार आहे.