Tuesday, January 21, 2025
HomeBreaking Newsबुलढाणा | भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले ४ ठार !...६...

बुलढाणा | भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले ४ ठार !…६ जखमी…

बुलढाणा : नागपूर-मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी भीषण अपघात घडला. Buldhana truck crushes laborers एका आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले या अपघातामध्ये 4 मजूर जागीच ठार झाले. तर 6 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर गावानजीक वडनेर भोलजी येथे ही घटना घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यातील वडनेर गावानजीक वडनेर भोलजी रस्त्याची कामासाठी आलेल्या मजुरांनी राहण्यासाठी रस्त्याच्या बाजूला झोपडी केली होती. आपल्या झोपडीत गाढ झोपेत असताना आज सकाळी 05/30 वा. ट्रक क्र. PB-11- CZ-4074 चालकाने आयशर ट्रक निष्काळजी पणे व भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावरून नेला यामध्ये 4 जनाचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी झाले आहे. तर मृत्यू झालेली सर्व तरुण मजूर मजूर होते.

मृत्यू झालेल्यांची नावे 1) प्रकाश मकु धांडेकर, वय 26 वर्ष, 2) पंकज तुळशीराम जांबेकर, वय 19 वर्ष, 3) अभिषेक रमेश जांबेकर वय 18 वर्ष रा. मोरगड 4) दीपक खोजी बेलसरे असे मृतकांची नावे असून सदर मजूर चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील असल्याची माहिती मिळत आहे. तर जखमींवर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सर्वांच्या मृत्यूस व ईतर मजुर लोकांना जखमी करण्यास कारणीभूत असलेला चालक घटनास्थळावरून वाहन सोडून मदत न करता पळून गेला आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: