बूलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने आज धडाकेबाज कारवाई करत मोटार सायकली चोरणारी आंतरराज्यीय टोळीतील 4 अट्टल चोरट्यांना जेरबंद केलय. यामध्ये ४२ दुचाकीसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. सदर आरोपी हे निर्जन स्थळी पार्क केलेल्या मोटार सायकल चोरायचे व त्या कमी पैशात बाहेर राज्यात तसेच बाहेर राज्यामध्ये चोरलेल्या महाराष्ट्रात विक्री करायचे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बूलढाणा जिल्ह्यातील होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या अनुशंगाने मा. श्री. सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, बुलढाणा, मा. श्री. अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक, खामगांव, मा. श्री. बि. बी. महामुनी, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक स्थापन करुन मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मा. श्री. अशोक लांडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये पथक स्थापन करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरु होती. सदर पथकाने अभिलेखावरील आरोपी तपासले तसेच गोपनिय बातमीदार कार्यान्वीत केले. दरम्यान पथकास मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहितीनुसार खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपीतांची नावे : 1 . शत्रुघ्न रामचंद्र सोळंके वय 28 वर्ष रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद ह.मु. रिधोरा ता. मोताळा जि बुलढाणा 2. गंगाराम इकराम पावरा वय 20 रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव 3. तुळशीराम इकराम पावरा वय 24 वर्ष रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव 4. सिताराम लेदा मुझाल्दे वय 24 वर्ष, रा. शिरवेल महादेव ता. भगवानपुरा जि. खरगोन मध्यप्रदेश आरोपीतांकडून जप्त विविध कंपनीच्या दुचाकी एकुण 42, किंमत अंदाजे 21,00,000/- रुपये त्यात महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील 06, जळगांव जिल्हयातील 09, नाशिक जिल्हयातील 04, मध्यप्रदेश राज्यातील 16 व 7 मोटार सायकलचा अभिलेख मिळुन आला नाही (आर टी ओ कार्यालयाकडून माहिती मिळविण्याची प्रक्रिया सुरु आहे.)
गुन्हे उघडकीस आणण्याची पध्दत:- स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे दिनांक 15/12/2023 रोजी आरोपी नामे शत्रुघ्न रामचंद्र सोळंके वय 28 वर्ष रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद ह.मु. रिधोरा ता. मोताळा हा विना कागदपत्राची मोटार सायकल विक्री करीता मोताळा परिसरात फिरत आहे. अशा गोपनिय माहितीवरुन त्यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातील मोटार सायकलचा अभिलेख पाहीला असता जळगांव जामोद येथील ग्राम वडशिंगी येथून सदरची मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी नामे शत्रुघ्न यास विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण विचारपूस केली असता, सदर मोटार सायकल चोरीच्या रॅकेट मध्ये 2. गंगाराम इकराम पावरा, वय 20 रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव 3. तुळशीराम इकराम पावरा वय 24 वर्ष, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव व 4. सिताराम लेदा मुझाल्दे, वय 24 वर्ष, रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन राज्य मध्यप्रदेश हे देखील मोटार सायकल चोरी व विक्री मध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीतांकडून आज पावेतो केलेल्या तपासामध्ये एकूण 42 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यात महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा, जळगांव, नाशिक तसेच मध्यप्रदेशातील मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरील नमुद चारही आरोपीतांना तपास दरम्यान अटक करण्यात आली असून सदरचा तपास पो.स्टे. जळगांव जामोद येथील पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांचे मार्गदर्शनात सपोनि सागर भास्कर व पोलीस अंमलदार उमेश शेगोकार हे करीत आहेत. आरापी 1 ते 3 यांना मा. विदयमान न्यायालय, जळगांव जामोद येथे हजर केले असता तपासाची गांर्भीयता पाहता मा. न्यायालयाने त्यांना दिनांक 21/12/2023 पावेतो पीसीआर दिला आहे. आरोपी क्रमांक 4 यास दिनांक 20/12/2023 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
स्था.गु.शा. बुलढाणा कामगिरी पथक: सदरीची कामगिरी ही मा. श्री सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, बुलडाणा, श्री अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक खामगांव, मा. श्री. बि. बी. महामुणी, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा यांच्या नेतृत्वात श्री नंदकिशोर काळे, सपोनि श्री. निलेश सोळंके, सपोनि, श्री. श्रीकांत जिंदमवार पोउपनि, पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, दशरथ जूमडे, दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, अनंत फरतडे, दिपक वायाळ, मनोज खर्डे, चालक पोकॉ विलास भोसले, सुरेश भिसे, सायबर पो.स्टे. चे राजु आडवे, अमोल तरमळे, संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी केली.
पोलीस प्रशासनाकडून आवाहन :- सर्व जणतेला आवाहण करण्यात येते की, दुचाकी सि.सी.टि.व्ही कॅमेऱ्याच्या निगराणी मध्ये पार्क करावी तसेच त्यास बाजार मध्ये उपलब्ध असलेले व्हील लॉकचा वापर करावा. कोणताही इसम विनाकागदपत्राची गाडी विक्री करीत असल्यास ती खरेदी करु नये/गहाण ठेवू नये तसेच संशयास्पद वाटणाऱ्या इसमांबददल किंवा त्यांचे ताब्यातील मोटार सायकलबाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील फोन क्रमांक 07262-242738 वर/प्रत्यक्ष येऊन अवगत करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल हि नम्र विनंती.