Monday, December 23, 2024
Homeराज्यबुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.सारंगजी आवाड साहेब यांची विहिंप पालक...

बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.सारंगजी आवाड साहेब यांची विहिंप पालक…

भाजपा मा.आ. चैनसुखजी संचेती व बजरंग दल प्रांत संयोजक ऍड अमोलजी अंधारे

विहिंप जिल्हाध्यक्ष राजेशजी झापर्डे यानी विहिंप पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली.

राज्यभरात सगळीकडे महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार तसेच बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा घटनांमध्ये पालक, शिक्षक यांच्या माध्यमातून मुलींमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

तसेच गौतस्करी चे वाढते प्रमाण यावर कठोर कारवाई आवश्यक आहे, असे मत मांडले व अत्याचाराच्या घटना, गुन्ह्यांची उकल, तपास, तक्रारींचे प्रमाण, कारवाई, हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून आलेल्या तक्रारी चर्चेतून जाणून घेतल्या,

त्याचबरोबर मलकापूर येथे विहिंप चा 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या शौर्य यात्रेबाबत माहिती देऊन यात्रेला भेट देण्याचे निमंत्रण अधीक्षक साहेबांना देण्यात आले यावेळी विहिंप जिल्हामंत्री राजेंद्रसिहजी राजपूत,बजरंग दल विभाग संयोजक गजाननजी धोरण ,मलकापूर प्रखंड अध्यक्ष संमतीजी जैन,श्रीकृष्णजी तायडे,दिपकजी कपले यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: