Friday, October 18, 2024
Homeराज्यबुलढाणा | शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० हजार रुपये रक्कम पिकविमा मंजुर करा…शिवसेना उध्दव...

बुलढाणा | शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० हजार रुपये रक्कम पिकविमा मंजुर करा…शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष खामगांव तालुक्याच्या वतीने मागणी…

बुलढाणा जिल्हयाचा पिकविमा मिळण्यासाठी यादीत समावेश करून खामगांव तालुक्यातील सोयाबीनवरील येलो मोझॅक कीडीमुळे व पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन कपासीस व पिके सर्व सुकल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० हजार रुपये रक्कम पिकविमा मंजुर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बाबत.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, खामगांव तालुका, शहर किसान सेना, महीला आघाडी, शिव उद्योग आघाडी, वाहतुक सेना शिवसेना खामगांव तालुक्याच्या वतीने बुलढाणा जिल्हयात पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळग्रस्त परीस्थिती निर्माण झाली असुन सोयाबीन कपासी व सर्व पिके सुकत असल्यामुळे व सोयाबीन वरील एलो मोझॅक या रोगाने खामगांव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत.

बुलढाणा जिल्हयाचे नांव पिक विमा मिळण्यासाठी वगळले असून त्वरीत बुलढाणा जिल्हयाच्या समावेश करुन खामगांव तालुक्याचा पिक विमा मंजुर करुन हेक्टरी पन्नास रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.

तरी विनंती की, या मागणीचा शासन दरबारी आपल्या स्तरावरुन त्वरीत विचार करुन शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांचे खात्यात जनी करण्याचे आदेश देण्यात यावे, याकरीता हे निवेदन देत आहोत.

विजय बोदडे तालुका प्रमुख डॉ संतोष तायडे जिल्हाप्रमुख शिव उधोग श्रीराम खेलदार, सुरेश लोखंडे, शंकर खराडे, रविभाऊ गुर्जर गजानन माने संतोष सावंग संतोष करे, प्रमोद कवळे अंकीत घोणे प्रकाश पवार श्रुतीलाई पतंगे महीला आघाडी ता.पु. ज्योतीलाई तारापुरे शहर प्रमुख बबीताताई हट्टेल अनिता शिरसार शोभा सावळे नंदालाई साकळ सुरेखाताई चिलनेत शोभाताई घुरेधर सर्व शिवसैनिक हजर होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: