Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीबुलढाणा | ५० वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या!...सैलानी येथील घटना...

बुलढाणा | ५० वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या!…सैलानी येथील घटना…

बुलढाणा : मागील दहा वर्षापासून सैलानी येथे वास्तव्यास असलेल्या पन्नास वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना 14 डिसेंबरच्या सायंकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्या विरोधात रायपुर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी विकास मुरलीधर कोतकर वय 27 वर्ष राहणार सुलतानपूर, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की तिची आई लता मुरलीधर कोतकर हिस मागील 10 वर्षापासून पायाचा त्रास असल्याने ती सैलानी येथे नेहमी दर्शनाकरिता येत होती व तेथेच राहत होती. दिनांक 14 डिसेंबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास फिर्यादीची बहीण सपना दीपक खिल्लारे हिने फोन करून सांगितले की ती आईला भेटण्यासाठी 2 दिवसांपूर्वी सैलानी येथे आली होती परंतु तिची आई सोबत भेट झाली नाही.

सपना ही सैलानी येथे हजर असताना तिला लोकांकडून समजले की सैलानीला लागूनच असलेल्या भडगाव शिवाराच्या जंगलामध्ये तिच्या आईचे प्रेत पडलेले आहे. तिने जाऊन पाहिले असता चेहरा व डोके पूर्णपणे दगडाने ठेचलेले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार राजवंत आठवले करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: