Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यानंतर नवीन सरकार आल्यावर संपूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पाच पूर्ण आणि एक अंतरिम बजेट आहे.
सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम
मोरारजी देसाई यांच्यानंतर त्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत, ज्यांनी सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची घोषणा करू शकते. याशिवाय, गावांवर लक्ष केंद्रित करणे आणि शेतकरी आणि महिलांसाठी निधी वाढवण्याची घोषणा देखील होऊ शकते.
किसान सन्मान निधी वाढू शकतो
तज्ज्ञांचा दावा आहे की किसान सन्मान निधी 9,000 रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो, तर महिला शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळू शकतात. महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास प्राधान्य असेल. त्यांना इतरांपेक्षा एक टक्का स्वस्त कर्ज मिळेल. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात जीवन विमा योजना देखील शक्य आहे.
2023 च्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 89,155 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 86,175 कोटी रुपये आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला, तर 2980 कोटी रुपये आरोग्य संशोधन विभागाला देण्यात आले. अर्थसंकल्पात, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानासाठी म्हणजेच NHM साठी 341.02 कोटी रुपये आणि राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्रामसाठी 133.73 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच 22 नवीन AIIMS सुरू करण्यासंबंधीच्या खर्चासाठी 6835 कोटी रुपये देण्यात आले. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेसाठी 3336 कोटी रुपये आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी 7200 कोटी रुपये वाटप करण्यात आले. 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
Capital outlay of Rs 2.40 lakh crore has been provided for #Railways; This highest ever outlay is about nine times the outlay made in FY 2013-14#AmritKaalBudget #Budget2023 pic.twitter.com/t2VkKM2fkP
— PIB India (@PIB_India) February 1, 2023