पातूर – निशांत गवई
गट क्रमांक चार मधील खाजगी( गुंठेवारी) जागेबाबत१.४८ पैकी अंदाज ३० ते ३५ प्लॉट सन २००० पासून दशरथ उजाडे मालकीचे शेतामध्ये त्यांनी व त्यांच्या मुलांनी मोजा हिंगणा वडेगाव येथील त्यांच्या मालकीचे गट क्रमांक ४ १.४८ अंदाजे ३० ते ३५ लोकांनी गुंठेवारी खरेदीनुसार राहण्यासाठी शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी संबंधित क्षेत्रफळांमधून (सातबारा) मधून कमी करून ग्रामपंचायत कार्यालया नियमाप्रमाणे अधिकृत करण्यात यावे ।हा विनंती अर्ज गट क्रमांक ३ मधील लेआउट झालेल्या रस्त्याबाबत केलेला असून या रस्त्याचा वाद झालेला आहे.
दिनांक १९.१.२०२३ रोजी पातुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी गावात आले होते दिनांक २०.१.२०२३ला ग्रामपंचायत कार्यालयाने सायंकाळी दवंडी दिली जे सरकारी रस्ते आहेत ते चालू करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल . या विषयाची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी गावतील ग्रामस्थ उपस्थित होते..