आकोट – संजय आठवले
दिनांक २९ जुलै २००२ रोजी आकोट शहरात सेवारत असलेल्या बुद्ध जयंती उत्सव समितीचे विद्यमाने आकोट शहरातील मागास प्रवर्गातील दहावी, बारावी तथा विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तथा त्यांचे पालकांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मुकुंद भारसाखळे संस्थापक, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आकोट उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला संस्थापक सचिव अशोक इंगळे,
सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट सोसायटी उपाध्यक्ष रमेश तायडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पि.टी. इंगळे, ज्येष्ठ पत्रकार संजय आठवले, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बी.एस. पाचपाटील, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुरेश गवई, सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद ऊके यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्राध्यापक मुकुंद भारसाखळे यांनी वर्तमान सामाजिक स्थिती, दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या, विद्यार्थ्यां पुढील आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्याची तयारी याबाबत मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी सर्वप्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मान्यवरांचे हस्ते गुणवंत विद्यार्थी तथा त्यांचे पालक यांचा ह्रृद्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे प्रास्ताविक प्राध्यापक अजय घनबहादूर यांनी, सूत्रसंचालन दिवाकर गवई यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत सावळे यांनी केले.
या कार्यक्रमाकरिता गोपाळराव तेलगोटे, उत्तमराव तेलगोटे, विश्वासराव पाचपाटील, भगवान वानखडे, विनोद अस्वार, रशीद भाई, सिद्धेश्वर बेराड, प्रमिलाताई वानखडे, सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, विजय निखाडे, अक्षय तेलगोटे, आनंद ओइंबे ,रोशन गवई, विशाल आग्रे, सक्सेस लबडे, पंजाबराव पाचपाटील यांचे सह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता एडवोकेट सुनील खंडेराव यांनी अथक प्रयास केले.