नागपूर – शरद नागदेवे
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज एड सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव व विदर्भ झोन इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, महाराष्ट्र प्रदेश चे सदस्य व विदर्भ झोन चे इंचार्ज इंजि दादाराव उईके, तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी प्रदेश बसपाच्या विभागीय कार्यालयात नागपूर शहर बसपाची कार्यकारिणी जाहीर केली.
नागपूर शहर प्रभारी शादाब खान व विकास नारायने, अध्यक्ष प्रकाश गजभिये, उपाध्यक्ष सुरेंद्र डोंगरे, महासचिव चंद्रशेखर कांबळे, सचिव महेंद्र मेश्राम, कोषाध्यक्ष तपेश पाटील. व सदस्य राजकुमार तांडेकर, आदींवर जबाबदारी देण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.
नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के व विलास सोमकुवर, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, सचिव अभिलेश वाहाने, जिल्हा कोषाध्यक्ष महेश वासनिक, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे सहित अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले