Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमलकापूर फ़ॉरेस्ट येथे दोन गटात जबर मारहाण...परस्परा विरुद्ध तक्रारी दाखलं

मलकापूर फ़ॉरेस्ट येथे दोन गटात जबर मारहाण…परस्परा विरुद्ध तक्रारी दाखलं

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील ग्राम मलकापूर फ़ॉरेस्ट येथे शेती च्या वादतून दोन गटात जबर मारहाण झाली असून दोन्ही गटातील पुरुष व महिलां विरुद्ध परस्पर तक्रारी दाखलं करण्यात आल्या याबाबत सविस्तर वृत्त असे कि मलकापूर फ़ॉरेस्ट येथील चेंडू रतन चव्हाण व नवलचंद चव्हाण यांच्यात शेती वरून बरेच वर्षा पासून वादविवाद सुरु असून याबाबत प्रकरण कोर्टात सुरु असून दिनांक 17 ओक्टोम्बर रोजी सकाळी 8:30 वाजता चे दरम्यान परत शेती च्या विषय वरून वाद निर्माण होऊन दोन्ही गटा कडून कुऱ्हाड,

लोखंडी पाईप व काठी ने जबर मारहाण झाली याबाबत फिर्यादी चेंडू रतन चव्हाण याच्या तक्रारी वरून नवलचंद चतुर चव्हाण, संजय श्रीराम चव्हाण, संदीप श्रीराम चव्हाण, सूरज नवलचंद चव्हाण,शुभम नवलचंद चव्हाण अनिकेत संजय चव्हाण, अजय संजय चव्हाण, लताबाई नवलचंद चव्हाण, संगीताबाई संजय चव्हाण, देवकाबाई संदीप चव्हाण,

वनिता रणजित चव्हाण सर्व रा. मलकापूर फ़ॉरेस्ट यांच्या विरुद्ध अप नंबर 344/2022कलम 326,324,323,504,506,143,144,147,148,149,447 भदवी गुन्हा दाखल करण्यात आला असून नवलचंद चतरू चव्हाण याच्या तक्रारी वरून चेंडू रतन चव्हाण, दिलीप चेंडू चव्हाण, रंगलाल रतन चव्हाण, पुंडलिक जोगीराम चव्हाण, साजन जोगीराम चव्हाण, गणेश चेंडू चव्हाण, किसन रतन चव्हाण, सजन रंगलाल चव्हाण, प्रमिला जोगीराम चव्हाण,

लक्ष्मीबाई नरेंद्र चव्हाण, मायाबाई रंगलाल चव्हाण, सविताबाई गजानन चव्हाण, कविता माणिक चव्हाण सर्व रा. मलकापूर फ़ॉरेस्ट यांच्या विरुद्ध अप. नंबर 345/2022कलम 143,144,147,148,149,324,323,504,506 भादवी गुन्हा दाखलं करण्यात आला असून ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शन खाली हेड कॉन्स्टेबल मोहन भारस्कर, संबोधी इंगळे हे तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: