Sunday, December 22, 2024
Homeविविधभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपली भेट होणं कठीण काम! आपण...

भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपली भेट होणं कठीण काम! आपण समाजकार्य, सिनेमा व प्रमोशन मधे व्यस्त..!

मुंबई – गणेश तळेकर

आपली लाडकी बहिण शीतल करदेकर आमरण उपोषणाला बसणार! आग्रह हाच की आपल्या चौथ्या स्तंभासाठी कल्याणकारी मंडळ (वेल्फेअर बोर्ड) करा! पत्रकारांना सन्मान द्या आर्थिक मानसिक समाजिक दृष्ट्या सक्षम करा! जगज्जेत्या टीमवर कोटीच्या कोटी ची उधळण करताय,पाण्यात वाहून गेले, होर्डिग्ज पडून जीव गेले तर लाखो त मदत करताय! श्रमिक पत्रकार रोज झिजतोय,तणावात जगतोय!कुणी राजकारण्याची हाजी हाजी करतोय ,तर कुणी काम टिकवण्यास धडपडतोय! वास्तव भयंकर आहे!

आपणास निवेदने देण्यात आली की त्याचं लोणचे होतं किंवा कचरा होतो यापलीकडे काहीच होत नाही! माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटून विषयही समजून घेतला नाही! आपण किमान समजुन घेण्याची तयारी दाखवता! आपले सल्लागार किती संवेदनशील आहेत ते लवकरच कळेल! पण एक आहे की मी माझ्या एकटीसाठी नाही मागत काही ; लोकशाहीच्या हितासाठी मागतेय! पत्रकार हितासाठी वेल्फेअर बोर्ड तातडीने गठीत करा! आपल्या व अर्थ मंत्री अजित दादा पवार यांच्या ठोस निर्णयाची वाट पहातेय! आधीच माझी तब्येत ठीक नसते,पण या कामासाठी माझा जीवही पणाला लावीन! भाऊ, आपली लाडकी बहिण वाट पहातेय!

१० जुलैला आमरण उपोषणास बसणार! मुंबईत !
शीतल करदेकर
संस्थापक अध्यक्ष
मीडिया असोसिएशन ऑफ  इंडिया

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: